Maruti Stotra in Marathi
मारुती स्तोत्र मराठी मध्ये.
Read Maruti Stotra in Marathi, with lyrics available for download in PDF format.
मारुती स्तोत्र

भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।
वनारि अंजनीसूता । रामदूता प्रभजना ॥१॥

महाबली प्राणदाता । सकळां ऊठवी बळें ।
सौख्यकारी शोकहर्ता । धूर्त वैष्णव गायका ॥२॥

दिनानाथा हरीरूपा । सुंदरा जगदंतरा ।
पाताल देवता हंता । भव्य शेंदूरलेपना ॥३॥

लोकनाथा जगन्नाथा । प्राणनाथा पुरातना ।
पुण्यवंता पुण्यशीला पावना परतोषका ॥४॥

ध्वजांगें उचली बाही । आवेशें लाटला पुढें ।
कालग्रि कालरुद्राग्रि । देखतां कापती भयें ॥५॥

ब्रह्यांडें माईल नेणों । आवळे दंतपंगती ।
नेत्राग्रीं चालिल्या ज्वाळा । भृकुटी ताठिल्या बळें ॥६॥

पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटें कुंडलें वरी ।
सुवर्ण घटि कासोटी । घंटा किंकिणि नागरा ॥७॥

ठकारे पर्वताऐसा । नेटका सडपातळू ।
चपलांग पाहतां मोठें । महाविद्युल्लतेपरी ॥८॥

कोटिच्या कोटि उड्डाणें । झेंपावे उत्तरेकडे ।
मंद्राद्री-सारिखा द्रोणू । क्तोधें उत्पाटिला बळें ॥९॥

आणिला मागुती नेला । आला गेला मनोगतीं ।
मनासी टाकिले मागें । गतीसी तुळणा नसे ॥१०॥

अणुपासूनि ब्रह्मांडा । एवढा होत जातसे ।
ब्रह्मांडाभोंवत वेढे । वज्रपुच्छ घालवूं शके ॥११॥

तयासी तुळणा कोठें । मेरु मंदार धाकुटे ।
तयासी तुळणा कैशी । ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥१२॥

आरक्त देखिलें डोळां । गिळिलें सूर्यमंडळा ।
वाढतां वाढतां वाढे । भेदिल शून्यमंडळा ॥१३॥

भूत प्रेत समंधादि । रोगव्याधि समस्तहि ।
नासती तुटती चिंता । आनंदें भीमदर्शनें ॥१४॥

हे धरा पंधरा श्र्लोकी । लाभली शोभली भली ।
दृढ देहो नि:संदेहो । संख्या चंद्रकळा गुणें ॥१५॥

रामदासीं अप्रगणू । कपिकुळासी मंडणू ।
रामरूप अंतरात्मा । दर्शनें दोष नासती ॥१६॥

॥ भीमरूपी स्तोत्र संपूर्ण ॥
Related Mantras
Hanuman Chalisa in Marathi Bajrang Baan in Marathi Gayatri Mantra in Marathi Maha Mrityunjaya Mantra in Marathi Ganpati Stotra in Marathi Shubham Karoti Kalyanam in Marathi Sai Baba Mantra in Marathi Ganpati Aarti in Marathi Ram Raksha Stotra in Marathi Swami Samarth Mantra in Marathi
© 2024. All rights reserved MantraMaya.com *