मारुती स्तोत्र
भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।
वनारि अंजनीसूता । रामदूता प्रभजना
॥१॥
महाबली प्राणदाता । सकळां ऊठवी बळें ।
सौख्यकारी शोकहर्ता । धूर्त वैष्णव गायका
॥२॥
दिनानाथा हरीरूपा । सुंदरा जगदंतरा ।
पाताल देवता हंता । भव्य शेंदूरलेपना
॥३॥
लोकनाथा जगन्नाथा । प्राणनाथा पुरातना ।
पुण्यवंता पुण्यशीला पावना परतोषका
॥४॥
ध्वजांगें उचली बाही । आवेशें लाटला पुढें ।
कालग्रि कालरुद्राग्रि । देखतां कापती भयें
॥५॥
ब्रह्यांडें माईल नेणों । आवळे दंतपंगती ।
नेत्राग्रीं चालिल्या ज्वाळा । भृकुटी ताठिल्या बळें
॥६॥
पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटें कुंडलें वरी ।
सुवर्ण घटि कासोटी । घंटा किंकिणि नागरा
॥७॥
ठकारे पर्वताऐसा । नेटका सडपातळू ।
चपलांग पाहतां मोठें । महाविद्युल्लतेपरी
॥८॥
कोटिच्या कोटि उड्डाणें । झेंपावे उत्तरेकडे ।
मंद्राद्री-सारिखा द्रोणू । क्तोधें उत्पाटिला बळें
॥९॥
आणिला मागुती नेला । आला गेला मनोगतीं ।
मनासी टाकिले मागें । गतीसी तुळणा नसे
॥१०॥
अणुपासूनि ब्रह्मांडा । एवढा होत जातसे ।
ब्रह्मांडाभोंवत वेढे । वज्रपुच्छ घालवूं शके
॥११॥
तयासी तुळणा कोठें । मेरु मंदार धाकुटे ।
तयासी तुळणा कैशी । ब्रह्मांडीं पाहतां नसे
॥१२॥
आरक्त देखिलें डोळां । गिळिलें सूर्यमंडळा ।
वाढतां वाढतां वाढे । भेदिल शून्यमंडळा
॥१३॥
भूत प्रेत समंधादि । रोगव्याधि समस्तहि ।
नासती तुटती चिंता । आनंदें भीमदर्शनें
॥१४॥
हे धरा पंधरा श्र्लोकी । लाभली शोभली भली ।
दृढ देहो नि:संदेहो । संख्या चंद्रकळा गुणें
॥१५॥
रामदासीं अप्रगणू । कपिकुळासी मंडणू ।
रामरूप अंतरात्मा । दर्शनें दोष नासती
॥१६॥
॥ भीमरूपी स्तोत्र संपूर्ण ॥